Asian Games@ ऑफ दी फिल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 04:32 PM2018-08-28T16:32:02+5:302018-08-28T16:34:24+5:30

आशियाई स्पर्धेचा मंगळवारचा दहावा दिवस. या दिवसात जकार्तातील क्रीडा प्रेमींनी काही अविस्मरणीय क्षण अनुभवले. मात्र, ज्यांना तेथे उपस्थित राहता आले नाही त्यांच्यासाठी आशियाई स्पर्धेतील हे काही ऑफ दी फिल्ड क्षण...

महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात पाण्याच्या अडथळ्यातून वाट काढणाऱ्या धावपटू...

महिलांच्या 68 किलोवरील वजनी गटातील कराटे सामन्यात जपानच्या आयुमी युकूसा आणि चीनच्या गाओ मेंगमेंग यांच्यातील चुरशीचा क्षण...

1500 मीटर डेकॅथलॉन स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी पुरुष धावपटूंनी एकत्रित दिलेली ही पोझ...

3 बाय 3 बास्केटबॉलच्या कांस्यपदकाच्या लढतीत इराणचा अमिरहोसेन अझारी आणि थायलंडच्या निथिपोल सवाथवोर्न यांच्यात चेंडूवर ताबा मिळवण्यासाठीची धडपड...

67 किलो वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत संयुक्त अरब अमिरातीच्या अहमद अल-हध्रामी याला इंडोनेशियाच्या जिंटर सिमाजुंटकचे आक्रमण थोपवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली...

महिलांच्या 100 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत मांजर आडवी गेली, तिला ट्रॅकवरून पळवण्यासाठी कर्मचाऱ्यांची चाललेली धडपड...

पुरुषांच्या स्पीड आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्स प्रकारात इराणचा रेझा अॅलिपोर आणि इंडोनेशियाचा साब्री यांच्यातील चुरस...