खेळाडू दोन, सामना अन् विक्रम एकच...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 05:53 PM2018-11-15T17:53:39+5:302018-11-15T17:55:10+5:30

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात आत्तापर्यंत अनेक विक्रम नोंदवले गेले. पण, बुधवारी झालेल्या सामन्यात विक्रमाचा विलक्षण योग जुळून आला.

तमीळ थलायव्हाज आणि हरयाणा स्टीलर्स यांच्यातील सामना बरोबरीत सुटला, परंतु या सामन्यात अजय ठाकूर आणि विकास खांडोला यांनी त्या सामन्यात एकच विक्रम केला.

थलायव्हाजच्या अजय ठाकूर आणि स्टीलर्सच्या विकास खंडोला यांनी सहाव्या सत्रात चढाईच्या 100 गुणांचा पल्ला ओलांडला.

अजयच्या नावावर 10 सामन्यात 102 गुण आहेत, तर विकासने 13 सामन्यांत 110 गुणांची कमाई केली आहे.

या सत्रात सर्वाधिक चढाईच्या गुणांची कमाई करणाऱ्यांत यू मुंबाचा सिद्धार्थ देसाई ( 126) आघाडीवर आहे.