जाणून घ्या बिप्लब देव यांच्या मते सुंदर नसणारी डायना हेडन आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 02:46 PM2018-04-27T14:46:27+5:302018-04-27T14:46:27+5:30

1997 साली डायना हेडने विश्व सुंदरी हा किताब आपल्या नावे केला. त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी तिच्या सुंदरतेवर आता प्रश्न उपस्थित केले आहेत. डायना किताब जिंकणार हे ठरलेलं असं म्हणत त्यांनी तिच्या सुंदरतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

देव यांनी महाभारत काळातील इंटरनेटवरून केलेल्या वक्तव्यामुळे सुरू झालेली चर्चा थांबत नाही तोच त्यांनी माजी मिस वर्ल्ड डायना हेडनबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

डायना हेडन दिर्घकाळापासून लाइमलाइटपासून दूर आहे. 1997 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तिने विश्व सुंदरीचा किताब जिंकला. विश्व सुंदरीचा किताब जिंकणारी ती तिसरी भारतीये आहे. तिच्या आधी ऐश्वर्या राय व रीता फारिया यांच्याकडे हा किताब होता.

डायना हेडनने 2008मध्ये बिग बॉस-2 या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता.

मॉडेल म्हणून करिअरची सुरूवात करण्याआधी डायना एका इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करत होती. त्यानंतर तिने एका कंपनीत पीआर ऑफिसरचंही काम केलं आहे. डायनाने 2013 साली लास वेगासमध्ये कॉलिन जिकशी विवाह केला. 2016 साली तिने मुलीला जन्म दिला.