'सुपरमून'चं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 07:18 PM2017-12-04T19:18:34+5:302017-12-04T19:20:46+5:30

रविवारी (4 डिसेंबर ) रात्री सुपरमूनचं दर्शन घडलं

पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आला, तर त्याला सुपरमून म्हटलं जाते.

चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष 84 हजार किलोमीटर अंतरावर असतो.

पंरतु रविवारी चंद्र पृथ्वीपासून जवळपास 3 लक्ष 57 हजार किलोमीटर अंतरावर होता.

सुपरमून हा योग जेव्हा जुळून आला तेव्हा पौर्णिमेचे चंद्रबिंब नेहमीपेक्षा सुमारे 14 टक्के मोठे व सोळा टक्के जास्त तेजस्वी दिसत होते.