हे आहेत फोर्ब्सच्या यादीतील श्रीमंत टॉप 5 सेलिब्रेटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 02:34 PM2017-12-23T14:34:27+5:302017-12-23T14:45:39+5:30

फोर्ब्स मॅगझीनने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलेब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत यावर्षी देखील अभिनेता सलमान खान पहिल्या स्थानावर आहे. सलमान खानचं वार्षिक उत्पन्न 232 कोटी रुपय आहे.

दुसऱ्या क्रमांकावरील किंग खान शाहरुखने यंदाही हे स्थान अबाधित ठेवले आहे. शाहरुख खान 170 कोटी वार्षिक कमाईसह दुसऱ्या स्थानी आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या वर्षाही तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. विराट कोहलीची वार्षिक कमाई 100 कोटी रुपये इतकी आहे.

कमाईच्या यादीत चौथ्या स्थानी अभिनेता अक्षय कुमार असून त्याचं उत्पन्न 98 कोटी आहे

पाचव्या स्थानी सचिन तेंडुलकर (82 कोटी), आहे.