हे आहेत भारतातील सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे नेते

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 07:49 PM2019-04-05T19:49:57+5:302019-04-05T20:04:59+5:30

भारतात लोकशाही असल्याने कितीही मोठा नेता असला तरी त्याला दर पाच वर्षांनी निवडणुकीला सामोरे जावे लागते. निवडणुकीत मतदानाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास प्राप्त झाला की सत्तेवर राहता येते. असे असले तरी भारतात अनेक नेते आपल्या लोकप्रियतेच्या बळावर दीर्घकाळ सत्तेवर राहण्यात यशस्वी ठरले आहेत. अशाच काही नेत्यांच्या कारकिर्दीवर टाकलेली ही नजर.

पवनकुमार चामलिंग (24 वर्षे) - पवनकुमार चामलिंग हे गेल्या 24 वर्षांपासून सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. एखाद्या राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासाला सामोरे जाणार आहेत.

ज्योती बसू (32वर्षे) - डावे नेते ज्योती बसू यांनी दीर्घकाळ पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. 1977 ते 2000 या काळात ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी होते.

गेगांग अपांग (19 वर्षे) - गेगांग अपांग हे 1980 ते 1999 अशी सलग 19 वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

माणिक सरकार ( 19 वर्षे) - साधेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या माणिक सरकार यांनी 1998 ते 2018 अशी 19 वर्षे त्रिपुराचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते.

नवीन पटनाईक (19 वर्षे) बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनाईक हे गेल्या 19 वर्षांपासून ओदिशाचे मुख्यमंत्रिपद सांभाळत आहेत.

जवाहरलाल नेहरू (17 वर्षे) - देशाचे पंतप्रधानपद सर्वाधिक काळ भूषवण्याचा मान पं. जवाहरलाल नेहरू यांना मिळाला होता. देशाचे पहिले पंतप्रधान असलेले जवाहरलाल नेहरू 1947 ते 1964 अशी 17 वर्षे पंतप्रधानपदी होते.