राहुल गांधी @ 48

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 02:34 PM2018-06-19T14:34:44+5:302018-06-19T14:46:22+5:30

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 48 वा वाढदिवस आहे.

राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियावर राहुल गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केक कापून राहुल गांधींचा 48 वा वाढदिवस साजरा केला.

तसेच, काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय शैलीमध्ये बदल घडवून आणले आहेत.