रोहिंग्या मुस्लिमांवरील अन्यायाविरोधात दिल्लीत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 10:53 PM2017-09-13T22:53:46+5:302017-09-13T22:56:15+5:30

म्यानमारमधील राखीन प्रांतात रोहिंग्या मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचाराच्याविरुद्ध बुधवारी(दि.13) दिल्लीत मुस्लीम समाजाच्या महिलांनी आंदोलन केले.

यावेळी आंदोलकांनी दिल्लीतील म्यानमारच्या दूतावास कार्यालयासमोर जोरदार नारेबाजी केली.

म्यानमारमध्ये सुरू असलेल्या वांशिक हिंसाचारामुळे येथील रोहिंग्यांची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे.

गेल्या काही दिवसांत म्यानमारमधून हजारो रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशात आश्रय घेतलेला आहे.

याचबरोबर, काही रोहिंग्या मुस्लिम म्यानमारमधून गेली दोन ते तीन वर्षे थायलंड, इंडोनेशिया, मलेशियाच्या दिशेने समुद्रमार्गे जात आहेत.

म्यानमारमधील राखीन प्रांतात रोहिंग्या मुस्लिम वास्तव्यास आहेत.