सोशल मीडियावर तिची अदा व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 03:59 PM2018-02-12T15:59:01+5:302018-02-13T12:56:03+5:30

देशभरात सध्या व्हॅलेंटाईन वीक जोरात साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी जरा हटके आणि वेगवेगळ फंडे आजमावताना दिसत आहे. याच दरम्यान, एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाळकरी मुलगा व मुलगी इशा-यांतून एकमेकांना आपली 'मन की बात' सांगत असल्याचं पाहायला मिळत आहेत.

जिनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नजरेनं घायाळ करणारे बाण सोडणारी व्हिडीओतील ही तरुणी मल्याळम सिनेमातील अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आहे. व्हॅलेंटाईन वीकदरम्यान व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडीओमुळे सध्या देशभरात तिचीच चर्चा सुरू आहे.

प्रियाचा आगामी सिनेमा 'ओरू अदार लव्ह’ मधील ‘Manikya Malaraya Poovi’ या गाण्याचा हा व्हिडीओ आहे. हे गाणं शान रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे.

6 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये डोळ्यांच्या हावभावांतून आपलं प्रेम व्यक्त करताना ती दिसतेय.

सोशल मीडियावर प्रियाच्या सौंदर्याची प्रचंड स्तुती केली जात आहे. प्रिया ही केरळमधील त्रिशूर येथील राहणारी आहे. तिला डान्स आणि फिरण्याची आवड आहे.

प्रियाचा हा पहिलाच सिनेमा असून येत्या 3 मार्चला सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. मात्र सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रिया या व्हायरल व्हिडीओमुळे भलतीच प्रसिद्ध झाली आहे.

अगदी काल- परवापर्यंत ही प्रिया वारियनर कोण असा जर तुम्हाला प्रश्न विचारला असतं तर तुम्हालाही त्याचं उत्तर देता आलं नसतं. पण आता ती कोण आहे हे संपूर्ण भारताला माहिती झाले आहे.

प्रियाचा हा व्हिडिओ थोड्याच वेळात इतका व्हायरल झाला की तो टॉप ट्रेंडिंगमध्येही आला. एका रात्रीत स्टार होणं काय असतं हे आज प्रिया अनुभवत असेल यात काही शंका नाही.

Manikya Malaraya Poovi या गाण्याला आतापर्यंत ४,३७७,६४४ व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओचे अनेक मिम्सही तयार झाले आहेत.

प्रियाने इन्स्टाग्राम अकाऊंट ओपन केले होते तेव्हा पहिल्याच दिवशी तिचे 6 लाख फॉलोअर्स झाले होते. सध्याच्या घडीला तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या 7 लाख 30 हजार इतकी आहे. या व्हिडिओनंतर ही संख्या आणखीन वाढेल, यामध्ये शंका नाही.