पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरदार सरोवर धरणाचे केले लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 05:40 PM2017-09-18T17:40:33+5:302017-09-18T17:46:46+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ६७व्या वाढदिवशी सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण केले.

सरदार सरोवर धरणासाठी एकूण ६.८२ दशलक्ष घनमीटर काँक्रिट वापरले आहे.

अमेरिकेतील ग्रँड कोउले धरणानंतर, सरदार सरोवर हे सर्वात मोठे धरण आहे.

या धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग ८५ हजार घनफूट प्रतिसेकंद असेल. त्या दृष्टीने ते चीनमधील गाझेन्बा व ब्राझिलमधील तुकुरी या धरणांनंतर, तिस-या क्रमांकाचे धरण आहे.