डब्ल्यूइएफच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी डाव्होसमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 08:53 PM2018-01-22T20:53:29+5:302018-01-22T20:58:26+5:30

जागतिक आर्थिक फोरमच्या (डब्ल्यूइएफ) ४८ व्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी डाव्होस येथे दाखल झाले.

डाव्होस येथे राजकीय शिष्टाचारानुसार मोदींचे स्वागत करण्यात आले.

मंगळवारी होणा-या मुख्य भाषणात मोदी हे तरुण व आधुनिक भारताचे चित्र मांडणार आहेत. भारतातील उद्योगाभिमूख वातावरणासाठी उचलण्यात आलेली पावले, भ्रष्टाचारावर आणलेला आळा, काळ्या पैशांविरुद्धची मोहिम, कर संरचनेचे सुलभीकरण व यामार्फत विकासाला मिळणारी गती, हा विषय पंतप्रधान मोदी मांडतील, असे अधिका-यांचे म्हणणे आहे.

नवी दिल्ली येथून डाव्होसला रवाना होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टिपलेले छायाचित्र.