प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर संचलनाची रंगीत तालीम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 06:21 PM2018-01-24T18:21:04+5:302018-01-24T18:24:36+5:30

नवी दिल्ली : येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनासाठी लष्कराच्या विविध तुकड्यांमधील जवान सराव करत आहेत.

दरम्यान, राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका जाणवत असून अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे. यातच, नवी दिल्लीचा राजपथ परिसर सध्या जवानांच्या संचलन सरावामुळे बहरुन गेला आहे.

राजपथावर दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे भव्य संचलन पार पडते.

प्रजासत्ताक दिनाचे संचलन राजपथाच्या पश्चिमेकडील विजय चौकापासून लाल किल्ल्यापर्यंत जाते. संचलनाच्या सुरुवातीला पंतप्रधान देशाच्यावतीने अमर जवान ज्योती येथे शहीद जवानांना आदरांजली वाहतात.

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत 1950 साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले.

भारतीय संरक्षण दलाचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात.