दिल्ली विद्यापीठात NSUI ची बाजी, ABVP ला झटका - गेल्या सहा निवडणुकांची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 12:04 PM2017-09-15T12:04:11+5:302017-09-15T12:16:34+5:30

2012 - पाच वर्षांपूर्वी दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकांवर काँग्रेसप्रणीत NSUI या विद्यार्थी संघटनेचं वर्चस्व होतं. चारपैकी 3 जागा NSUI ने जिंकल्या होत्या आणि ABVP ला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं. प्रेसिडेंट झालेल्या अरूण हुडाचं काँग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी यांनी स्वत: जातीनं अभिनंदन केलं होतं.

2013 - या वर्षी मात्र चित्र पालटलं. भाजपाप्रणीत ABVP ने प्रेसिडेंट, व्हाइस प्रेसिडेंट व जॉइंट सेक्रेटरी या तीन जागा जिंकल्या व NSUI च्या पदरी केवळ सेक्रेटरी ही एक जागा पडली. ABVP च्या विजेत्यांचं पाठिराख्यांनी केलेलं स्वागत.

2014 - या वर्षी ABVPनं NSUI ला धूळ चारत चारही जागा पटकावल्या. विजय साजरा करताना ABVP ची उमेदवार कनिका शेखावत. याच वर्षी केंद्रात प्रचंड बहुमतानं मोदी सरकार आलं.

2015 - सलग दुसऱ्या वर्षी ABVP ने चारही जागा पटकावत दिल्ली विद्यापीठात वर्चस्व राखलं. ABVP चे विजयी उमेदवार.

2016 - NSUI नं कमबॅक करताना जॉइंट सेक्रेटरीपदाची निवडणूक जिंकली. मात्र, ABVP ने प्रेसिडेंट, व्हाइस प्रेसिडेंट व सेक्रेटरी या चार जागा जिंकत वरचश्मा राखला. ABVP चे उमेदवार अमित तनवर, प्रियांका छाब्री व अंकित संगवान.

2017 - या वर्षी मात्र NSUI नं ABVP ला अनपेक्षित व चांगलाच झटका दिला. ABVP ने सेक्रेटरी व जॉइंट सेक्रेटरी पदाची निवडणूक जिंकली मात्र प्रेसिडेंट व व्हाइस प्रेसिडेंट या महत्त्वाच्या जागांवर NSUI चे उमेदवार विजयी झाले. NSUI चे रॉकी तुसीद व कुमाल शेरावत यांनी या जागा जिंकल्या.