पाकिस्तानवर नजर ठेवणार आता भारताचे हे पाच उपग्रह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 03:39 PM2019-04-30T15:39:40+5:302019-04-30T16:02:02+5:30

पाकिस्तान आणि त्यांच्याकडील दहशतवादी स्थळांवर नजर ठेवण्यासाठी भारत नवे पाच उपग्रह लाँच करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी भारतानं रुपरेषाही आखली आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) येत्या 10 महिन्यांमध्ये 5 उपग्रह अवकाशात सोडणार आहे.

भारताचे हे उपग्रह पाकिस्तानबरोबरच इतर भागांवर नजर ठेवण्यासाठी सहाय्यक ठरणार आहेत.

या उपग्रहांचा वापर गुप्त माहिती ठेवणे आणि नियंत्रण रेषेवर हेरगिरीसाठी करण्यात येणार आहे. या सर्व उपग्रहांना 2020 पर्यंत लाँच करण्यात येणार आहे.

या उपग्रहांमध्येही चार उपग्रह हे रिसॅट श्रेणीतील कार्टोसेट सीरिजमधील आहेत. या उपग्रहांच्या माध्यमातून गुप्त माहिती मिळणार असून, अद्यापही त्यांची अधिकृतरीत्या माहिती देण्यात आलेली नाही.

टॅग्स :इस्रोisro