दिल्लीत 'यंग इंडिया, न्यू इंडिया' थीमवर आधारीत विद्यार्थ्यांच्या परिषदेला मोदींनी केलं संबोधित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 04:18 PM2017-09-11T16:18:32+5:302017-09-11T16:22:11+5:30

स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागोमध्ये केलेल्या प्रसिद्ध भाषणाला आज 125 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने 'यंग इंडिया, न्यू इंडिया' थीमवर आधारीत विद्यार्थ्यांच्या परिषदेला मोदींनी संबोधित केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील तरुणांपुढे 'स्वच्छ भारत'चा नारा दिला. 'आधी शौचालय, मग देवालय', या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार मोदींनी केला.

पंतप्रधान मोदी यांचं भाषण झालं आणि ते देशभरातील सर्व विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थांमध्ये लाइव्ह दाखवण्यात आलं.

मोदींनी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंद यांच्या 'ब्रदर्स अँड सीसर्ट्स' या दोन शब्दांतून भारताच्या ताकदीचा परिचय करुन दिला.