मुंबईत ममता बॅनर्जी -उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 08:01 PM2017-11-02T20:01:49+5:302017-11-02T20:04:28+5:30

केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज भेट झाली.

दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही भेट झाली. या भेटीचे फोटो समोर आले आहेत.

या भेटीदरम्यान उद्धव यांच्यासोबत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे देखील दिसत आहेत. सुत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार ही बैठक अर्धा तास सुरू होती.

या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पण ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे.

केंद्रातील मोदी सरकारला विरोध या मुद्यावर हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे.