बाप रे बाप! चक्क प्रियंका गांधींच्या हातात साप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:12 PM2019-05-02T15:12:26+5:302019-05-02T15:34:14+5:30

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीमध्ये प्रचार करत आहेत.

त्याच दरम्यान त्या सापांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हंसातल्या पुरवा येथे गेल्या.

प्रियंका यांनी गारुड्यांशी बातचीत केली आणि त्यांच्याकडून सापांसंदर्भात माहिती जाणून घेतली.

विशेष म्हणजे प्रियंका गांधी यांनी विषारी सापांना आपल्या हातात खेळवलं.

प्रियंका गांधी 6 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचार करत आहे.

गारुड्यांनी त्यांना सापांच्या जातीसंदर्भात माहिती दिली. प्रियंका गांधींनी एका सापाला हातात पकडल्याचंही पाहायला मिळत होतं.