वाजपेयींना अखेरची मानवंदना ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 07:48 PM2018-08-17T19:48:29+5:302018-08-17T19:56:41+5:30

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची गुरुवारी प्राणज्योत मालवली.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दिल्लीतील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी मंत्राग्नी दिला.

यावेळी राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, लालकृष्ण आडवाणी, अमित शहा आणि तिन्ही सेनादल प्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण केले.

तसेच, त्यांना 300 जवानांनी अखेरची मानवंदना दिली.

अनेक पक्षांचे नेते, भाजप कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.