जाणून घ्या, 1 एप्रिलपासून तुमच्या आयुष्यात घडणारे नवीन बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 11:32 AM2019-03-26T11:32:16+5:302019-03-26T11:40:50+5:30

१ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होते. या दिवसापासून वेगवेगळे कायदे बदलतात. त्यामुळे यावर्षीही १ एप्रिलपासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. बरेच नियम येणार आहेत. या नियमंविषयी माहिती तुम्हाला होणे जरुरीचे आहे. हे बदल तुमची नौकरी, पॅन कार्ड, प्रॉपर्टी, जीएसटी, बँक, ईपीएफ संदर्भात असणार आहेत.

सगळ्या बँकांना व्याजदर ठरवण्यासाठी एक वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल. व्याजदराला एक्सटरनल बँचमार्कसोबत लिंक करावं लागणार आहे. यापुढे आरबीआयने रेपो रेटमध्ये घट केल्यास तातडीने बॅंकांना आपले व्याज दर कमी करावे लागणार

रियल ईस्टेटमध्ये जीएसटीचे नवे नियम लागू होतील. स्वस्त घरांवर लागणारा ८ टक्के जीएसटी दर १ टक्के होणार आणि अंडर कंस्ट्रक्शन प्रॉपर्टीवरील १२ टक्के जीएसटी दरात घट होऊन ५ टक्के जीएसटी भरावा लागणार

जर तुम्ही ट्रेनची बुकिंग केली असेल तर आणि तुमची ती ट्रेन सूटली तर रेल्वे तुम्हाला रिफंड देईल.

तुम्ही २ पीएनआर एकमेकांशी लिंक करु शकणार आहेत. म्हणजे दोन ट्रेनसाठी एक संयुक्त PNR नंबर दिला जाईल. त्यामुळे एखादी ट्रेन सुटली तर दुसऱ्या ट्रेनमध्ये तुम्हाला जागा मिळू शकेल.

नोकरी बदलल्यावर ऑटोमॅटीक पीएफ अकाउंट दुसऱ्या कंपनीत ट्रान्सफर होणार. त्यासाठी ईपीएफओला अर्ज करण्याची गरज नसेल.

विजेची चोरी रोखण्यासाठी 1 एप्रिलपासून प्रत्येक घरात प्रीपेड मीटर लावण्यात येणार आहे. मोबाइलच्या प्रीपेड सिमकार्डसारखेच विजेचे प्रीपेड मीटर असेल. त्यात शिल्लक रक्कम असेपर्यंत वीज वापरता येईल. ती संपताच वीजपुरवठा बंद होईल आणि कार्ड रिचार्ज करताच वीजपुरवठा पुन्हा सुरू होईल.