हवाई दलाचा 85वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 07:25 PM2017-10-08T19:25:47+5:302017-10-08T19:28:13+5:30

हवाई दलाचा 85वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

हवाई दलाच्या गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर आज मोठं शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं.

यावेळी सुखोई, तेजस, मिराज, मिग, लढाऊ विमान सी-17, सी-130 यांसारखी विमानं व हेलिकॉप्टर्स कवायतीमध्ये सहभागी झाली होती.

एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी दिवंगत मार्शल अर्जुन सिंह यांच्या आठवणी जागवल्या.

तसेच गुरुवारी दुर्घटनाग्रस्त झालेल्या एम-17 व्ही-5 हेलिकॉप्टरमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांनाही त्यांनी आदरांजली अर्पण केली.