गुजरातमधला भीषण अपघात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2018 06:49 PM2018-03-06T18:49:35+5:302018-03-06T18:49:35+5:30

गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात लग्नाचं वहाऱ्ड घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला.

या ट्रकमध्ये जवळपास 60 माणसे होती. त्यातील 28 जणांचा मृत्यू झाला.

भावनगर-राजकोट महामार्गावर उमरालाजवळ हा ट्रक पलटी होऊन नाल्यात कोसळला.

अपघातग्रस्त लोकांना ट्रकमधून बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांनी क्रेनची मदत घेतली.