गुजरात विधानसभा निवडणूक 2017 : आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूजमधून केली प्रचाराची सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 04:46 PM2017-11-27T16:46:21+5:302017-11-27T17:00:27+5:30

गुजरात विधानसभा निवडणुक जवळ येऊ लागल्याने राज्यातील वातावरण अधिक तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील आजपासून प्रचाराच्या रणांगणात उडी घेतली. भूज येथे जाऊन त्यांनी तेथील जनता तसेच कार्यकत्यांची भेट घेतली.

भुज, जसदण, धारी अमरेली व कमरेज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या. प्रचार सभांचा प्रारंभ करण्यापूर्वी त्यांनी आशापुरा मातेच्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ट्विट करत म्हटले होते की, सोमवारपासून गुजरातमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा सुरू होणार असून पहिली सभा भूजमधील कच्छ येथे होणार आहे. हा जिल्हा त्यांच्यासाठी खूप जवळचा असल्याचंही ते ट्विटमध्ये म्हणाले.