गुजरात विधानसभा निवडणूकीत मोदींनी रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 11:23 PM2017-12-14T23:23:46+5:302017-12-14T23:30:11+5:30

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी आज मतदान झालं.

अमित शहा यांनी अहमदाबादमधील नाननपूरा येथील मतदान केंद्रावर मतदान केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन यांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी गांधीनगरमधील सेक्टर 22 येथील शाळेत जाऊन मतदान केलं. त्यांचं वय 97 वर्ष आहे. यावेळी त्यांनी भाजपाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.

. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. मोदींनी साबरमतीमधील रानिप येथील 115 क्रमांकाच्या बूथवर मतदान केलं. मतदान करण्यासाठी पोहोचलेले नरेंद्र मोदी यावेळी रांगेत उभे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही साबरमतीमधील राणिप येथील केंद्रावर मतदान केलं. मतदानानंतर मोदी केंद्राबाहेर आले. त्यावेळी लोकांनी रस्त्यावर तुफान गर्दी केली होती. मोदींनीही कारच्या फूटबोर्डवर उभं राहून लोकांना अभिवादन केलं.