गोव्यातील आदिवासी महोत्सवाची उत्साहात सांगता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 04:35 PM2018-01-07T16:35:46+5:302018-01-07T16:42:45+5:30

गोव्यातील आदिवासी महोत्सवाची उत्साहात सांगता झाली आहे. (छायाचित्र : पिनाक कल्लोळी)

आदिवासी समाजाला एकत्र आणून त्यांच्यातील पारंपरिक कलागुणांना वाव देण्याचा यामागे हेतू असतो.

या आदिवासी संस्कृतीचे दर्शन लोकांना व्हावे यासाठी केपे येथील आदिवासी संघटना तसेच कला संस्कृती व आदिवासी कल्याण खात्यातर्फे या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

गोव्यातील कपेलभाट मैदानावर आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय आदिवासी महोत्सव उत्साहात पार पडला.

या महोत्सवात परंपरागत आदिवासी कारागिरी, आदिवासी खाद्यान्न तसेच विविध खेळ यांचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवात आदिवासींच्या कलेचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं.

टॅग्स :गोवाgoa