संरक्षणमंत्र्यांची 'सुखोई'तून भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 05:55 PM2018-01-17T17:55:34+5:302018-01-17T18:00:44+5:30

जयपूर : संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सुखोई विमानातून भरारी घेतली.

हवाई दलाच्या जोधपूर विमानतळाहून त्यांनी सुखोई-30 एमएके या विमानातून उड्डाण केलं.

सुखोईतून उड्डाण करणाऱ्या निर्मला सीतारमण या पहिल्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत.

यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही सुखोईतून भरारी घेतली होती.

31 स्वार्डन लॉयन यांच्याकडे संरक्षण मंत्र्यांच्या उड्डाणाची जबाबदारी होती. नुकतंच निर्मला सीतारमण यांनी आयएनएस विक्रमादित्यवर मिग-29 या विमानातून उड्डाण केलं होतं.

सुखोई-30 एमएकेआय या विमानाला एयफोर्समध्ये मानाचं स्थान आहे. भारताकडे 2020 पर्यंत तब्बल अशी 270 विमानं असतील. मिग-21 आणि मिग 27 यांच्या जागी ही लढाऊ विमानं घेतील.