देशभरात दिवाळीचा उत्साह!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 11:12 AM2017-10-18T11:12:49+5:302017-10-18T11:16:17+5:30

मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये इको-फ्रेण्डली दिवाळी साजरी केली जाते आहे. हॉस्पिटलच्या परिसरात लहान किल्ला बांधण्यात आला आहे.

दिवाळीमध्ये सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी तरूण-तरूणींची बाजारात गर्दी होते आहे. जम्मू-काश्मीरमधील बाजार आकर्षक वस्तूंनी सजला.

दिल्लीतील बाजार विविध फुलांनी सजला आहे. बाजारात हा लहान मुलगा फुलांमध्ये खेळायचा आनंद घेतो आहे.

सिलीगुरीमध्ये एका संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लॅनटर्न सोडून इको फ्रेंण्डली दिवाळी साजरी करण्याचा संदेश दिला.

अहमदाबादमध्ये लोकांनी रस्त्यावर मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या आहेत.