धोनीने पद्मभूषण पुरस्कार जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना केला समर्पित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 02:59 PM2018-04-03T14:59:12+5:302018-04-03T14:59:12+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सोमवारी नवी दिल्लीत पद्मभूषण सन्मानाने गौरवण्यात आलं.

महेंद्रसिंग धोनीने लेफ्टनंट कर्नलचा पोषाख घातला होता. यावेळी त्याची पत्नी साक्षीदेखील उपस्थित होती.

धोनीने बरोबर सात वर्षांपूर्वी २ एप्रिलला भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. या विजयाच्या सातव्या वर्धापनदिनीच त्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण सन्मान देण्यात आला.

महेंद्रसिंग धोनीने आपला हा सन्मान जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित केला आहे.

पद्मभूषण स्विकारणे हा माझ्यासाठी सन्मान असून तो लष्कराच्या गणवेशात स्विकारताना माझा आनंद दहापटीने वाढला होता. अशी भावना धोनीने व्यक्त केली.