अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू इस्माईलचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 10:31 PM2017-09-14T22:31:04+5:302017-09-14T22:38:11+5:30

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू इस्माईल याचा श्रीनगरजवळील नौगाममधील अरिबाग येथे सुरक्षा रक्षकांनी खात्मा केला.

याबाबत जम्मू-काश्मीर पोलीस महानिरीक्षक मुनीर खान, जीओसी आर्मी व्हिक्टर फोर्सचे बीएस राजू आणि सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक रविनदीप साही यांनी एकत्र पत्रकार परिषद घेवून माहिती दिली.

10 जुलै रोजी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात 7 यात्रेकरूंना जीव गमवावा लागला होता, तर 19 जण जखमी झाले होते.

त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला दहशतवादी अबू इस्माईलच्या शोधात होत्या.

दरम्यान, अबू इस्माईल याच्या खात्मानंतर श्रीनगरमधील इंटरनेट आणि मोबाईल सेवा स्थगित करण्यात आली आहे.