देशभरात मोठ्या उत्साहात बकरी ईद झाली साजरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 02:50 PM2017-09-02T14:50:52+5:302017-09-02T14:54:46+5:30

देशभरात आज मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी केली जात असून ठिकठिकाणी नमाजचं आयोजन करण्यात आलं होतं.

ईद-उल-अधा किंवा बकरी ईद हा मुस्लिमांचा सण आहे. या दिवशी कुराणमधील बळीची घटना साजरा केली जाते.

इस्लामच्या तीन मुख्य ईदपैकी हा एक दिवस आहे. या सणाला ‘ईद-उल-अज़हा’ किंवा ‘ईद-उज़-जुहा’ असेही म्हणतात.

याच महिन्यात मुस्लिम लोक हज यात्रेसाठी प्रयाण करतात.

मुस्लिम प्रथांनुसार ईदच्या दिवशी कोणत्याही चतुष्पाद प्राण्याचा बळी देण्यात येतो. त्यानुसार भारतात मुस्लिम बांधवांकडून बक-याची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे भारतात या सणासाठी बकरी ईद हे नाव प्रचलित झाले आहे.