अपेक्षांचे बजेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 06:24 PM2018-02-01T18:24:18+5:302018-02-01T18:36:08+5:30

पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी 'गावाकडे चला, बळीराजाला खुश करा, गरिबांना जपा', असाच काहीसा नारा मोदी सरकारनं दिला आहे.

करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत आणि टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल न करून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोकरदारांना निराश केलं.

मागच्यावर्षीच्या तुलनेत यंदा संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद फक्त 7.81 टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. यंदा संरक्षण क्षेत्रासाठी 2 लाख 95 हजार 511 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज बजेट मांडलं. यावेळी त्यांनी येत्या वर्षात 70 लाख नव्या नोक-या निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं म्हटलं आहे.

या अर्थसंकल्पामध्ये 2018-19 आर्थिक वर्षामध्ये 80हजार कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे.

डिजिटल व्यवहारांमध्ये ब्लॉकचेनचा वापर करण्याचा महत्त्वाचा निर्णय अरुण जेटली यांनी जाहीर केले. ब्लॉकचेनमुळे या व्यवहारांमध्ये भ्रष्टाचारावर आणि फसवणुकीला आळा बसेल.