#BirthdaySpecial : वाचा गीतकार जावेद अख्तर यांच्या 'या' काही खास शायरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 06:02 PM2018-01-16T18:02:43+5:302018-01-16T18:09:40+5:30

भारतीय जेष्ठ कवी, गीतकार, गझलकार, संगीत दिग्दर्शक आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांचा आज ७२वा जन्मदिवस. त्यांनी आजवर अनेक भारतीय चित्रपटांना अजरामर संगीत दिलं आहे. सलीम खान यांच्यासोबत त्यांनी केलेली उत्कृष्ट कामं आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

संगीत आणि मनोरंजन क्षेत्रातल्या कामगिरीसाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. तसंच साहित्य अकादमीच्या पुरस्कारानेही त्यांना सन्मामित करण्यात आलं आहे. तसेच त्यांना ५ राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.

त्यांनी बॉलिवूडला अंदाज, सीता और गीता, शोले, डॉन, यादों की बारात, जंजीर, दीवार, हाथ की सफाई, चाचा भतिजा, त्रिशुल, क्रांती, झमाना, लगान, मि. इंडीया, काला पथ्थर, शान आणि हाथी मेरे साथीसारखे चित्रपट दिले.

जावेद यांनी आपला मुलगा फरहानसोबतसुध्दा अनेकदा काम केलं आहे. त्यापैकी काही चित्रपट म्हणजे दिल चाहता है, लक्ष्य, रॉक ऑन. तसंच त्यांनी जिंदगी ना मिलेगी दोबारामध्ये आपली मुलगी झोयासोबत काम केलं आहे.

आपल्या धार्मिक दृष्टीकोनाबद्द्ल बोलताना जावेद म्हणतात की, ‘माझ्या नावावर जाऊ नका. मी नास्तिक आहे. कोणत्याही उर्जेला किंवा आकार नसलेल्या शक्तीला मानत नाही. मी हे याआधीसुध्दा माझ्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मी माझ्या मुलांनासुध्दा याच विचारसरणीने मोठं केलं आहे.’