953 खिडक्या असलेल्या वास्तूची जगभरात चर्चा, उकाड्यातही असते ACसारखी हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 02:41 PM2018-09-14T14:41:40+5:302018-09-14T14:47:07+5:30

जयपूरमधील ऐतिहासिक वास्तू‘हवा महल’ला तब्बल 953 खिडक्या आहेत. जीवघेण्या उकाड्यातही येथील वातावरण थंडगार असते, ही या वास्तूची खासियत आहे.

1799 मध्ये जयपूरचे महाराजा सवाई प्रताप सिंह यांनी ‘हवा महल’ची निर्मिती केली. मोठ्या प्रमाणात असलेल्या हवेशीर खिडक्यांमुळे महलाला 'हवा महल' नाव देण्यात आले, असे म्हटले जाते.

नवी दिल्लीपासून 268 किलोमीटर अंतरावर जयपूर आहे. 

राणी व राजकुमार यांना शहर आणि विशेष प्रसंगी निघणाऱ्या मिरवणुका पाहता यावे, यासाठी महलाची निर्मिती करण्यात आल्याचे म्हटले जाते.

हवामहलात आनंदपोल आणि चांदपोल नाव असलेले द्वार आहेत. आनंदपोलवर गणपतीची प्रतिमा आहे. दूर अंतरावरुन पाहिल्यास ही इमारत एखाद्या मुकुटाप्रमाणे दिसते.

टॅग्स :पर्यटनtourism