आशाताईंनी केलं मादाम तुसाँमधील पुतळ्याचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 04:06 PM2017-10-03T16:06:34+5:302017-10-03T16:13:32+5:30

गतवर्षी आशा भोसले यांनी एक्स्पर्टच्या टीमकडून मेजरमेंट होत असतानाचे फोटो शेअर केले होते.

जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयाची दिल्ली येथे शाखा उभारण्यात आली असून, आशाजींचा हा पुतळा संग्रहालयाच्या बॉलिवूड संगीत विभागात ठेवण्यात येणार आहे.

पुतळा अनावरण करतानाचा लाइव्ह व्हिडीओ आशाताईंच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर पुतळ्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्यांनी ट्विटसुद्धा केले आहे.

जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयाची दिल्ली येथे शाखा उभारण्यात आली असून, आशाजींचा हा पुतळा संग्रहालयाच्या बॉलिवूड संगीत विभागात ठेवण्यात येणार आहे.