भारतीय हवाई दलाचे 'मार्शल' अर्जन सिंग यांना अखेरचा सलाम !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 08:50 PM2017-09-18T20:50:22+5:302017-09-18T20:54:12+5:30

भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख आणि मार्शल ऑफ एअरफोर्स अर्जन सिंग (वय ९८ वर्षे) यांना अखेरचा निरोप देण्यात आला आहे.

सोमवारी (18 सप्टेंबर) सकाळी त्यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीतील ब्रार चौकात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्जन सिंग यांचे शनिवारी (16 सप्टेंबर) हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. शिवाय, तिन्ही दलांचे प्रमुखही तेथे उपस्थित होते.

भारतीय हवाई दलाचे पहिले आणि एकमेव मार्शल अर्जन सिंग यांनी आधी हवाई दलाचे प्रमुख म्हणून व नंतर राज्यपाल, प्रशासक व राजदूत म्हणून सुमारे 70 वर्षांच्या स्फूर्तिदायी कारकीर्दीत बहुमोल देशसेवा केली.

जानेवारी 2002 मध्ये सरकारने अर्जन सिंग यांना ‘मार्शल ऑफ एअर फोर्स’ हा सर्वोच्च हुद्दा निवृत्तीनंतर बहाल केला. या दर्जाचा सैन्यदलातील हुद्दा मिळालेले हवाई दलाचे अर्जन सिंग व लष्कराचे ‘फिल्ड मार्शल’ सॅम माणेकशा हे भारतातील फक्त दोनच अधिकारी आहेत.

अर्जन सिंग यांच्या ९७ व्या वाढदिवसानिमित्त आसाममधील पनागढ हवाई तळाला ‘एअर फोर्स स्टेशन अर्जन सिंग’ असे नाव दिले गेले. जिवंत अधिका-याचे नाव हवाई तळाला दिले जाण्याची ही एकमेव घटना आहे.

अर्जन सिंग यांच्या सन्मानार्थ आज राजधानीतील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविला.