लिंबू कलरच्या साडीनंतर निळ्या रंगाच्या ड्रेसमधील 'या' महिला अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 02:07 PM2019-05-13T14:07:28+5:302019-05-13T14:13:52+5:30

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा आला आहे, यादरम्यान नेत्यांची भाषणे आणि वक्तव्यं चर्चेची केंद्र बनली आहे. मात्र या सर्वात चर्चेत आहे ते म्हणजे मतदान केंद्रातील महिला अधिकाऱ्यांची फोटोची. सोशल मिडीयात हे फोटो प्रचंड व्हायरल होतायेत.

निळ्या रंगातील साडीत असणाऱ्या या महिला अधिकाऱ्याबाबत सांगितलं जातं की, या अधिकारी भोपाळ येथील गोविंदपुरा विधानसभेच्या मतदान केंद्रावर ड्युटीवर होत्या.

आपल्या सहकारी अधिकाऱ्यासोबत ईव्हीएम हातात घेऊन जाणाऱ्या या महिलेचा फोटो सोशल मिडीयात व्हायरल होतोय.

या महिलेच्या हातात ईव्हीएम बॉक्स आहे, ज्यात 154 आकडा लिहिण्यात आलाय. हा भोपाळ येथील गोविंदपुरा विधानसभा मतदान केंद्राचा आकडा आहे.

दरम्यान या महिलेची आणखी माहिती समोर आली नाही. याआधी उत्तर प्रदेशातील पिवळ्या साडीतील एका महिला अधिकाऱ्याचा फोटोही व्हायरल झाला होता.

ही लिंबू कलरची साडी घातलेली महिला एक सरकारी अधिकारी आहे. जी तिच्या स्टाईलिश अदांनी सोशल मिडीयात चर्चेचा विषय बनली. या महिलेचं नाव रीना द्विवेदी आहे. जी बांधकाम विभागात कार्यरत आहे.