पतेती - ‘पारशी नववर्ष’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 06:34 PM2017-08-17T18:34:12+5:302017-08-17T19:43:10+5:30

आज पतेती…. पतेती म्हणजे पारशी लोकांच्या नवीन वर्षाची सुरुवात. पारशी वर्षारंभ दिनाला ‘नवरोज’ म्हणतात.

पारशी नूतन वर्षाचा प्रारंभ ‘फरवर्दीन’ मासाने होतो. तत्पूर्वी आज पारशी वर्षाचा अखेरचा दिवस ‘पतेती’ म्हणून साजरा केला जातो.

वर्षभरात पतेती, नवरोज व चैत्रात जमशेदजी नवरोज हे तीन सण साजरे केले जातात

नवरोजला नव्या वर्षाच्या प्रारंभानिमित्त मंगलमय वातावरणात सकाळी अग्यारीत अग्नीची पूजा केली जाते. पंचमहाभूतांची देखील पूजा होते

पारशी समाजाचे दैवत म्हणजे ‘अग्निदेव’ व धर्मसंस्थापक झरतुष्ट्र हे होत (दत्ता खेडेकर)

चैत्रातला जमशेदजी नवरोज हा ‘चैत्रगौरी’प्रमाणे साजरा केला जातो (दत्ता खेडेकर)

पारशी वर्षाचे शेवटचे दहा दिवस हे पितृपक्षाप्रमाणे पितरशांतीकरिता पाळले जातात (दत्ता खेडेकर)

या दहा दिवसांत प्रत्येक पारशी कुटुंबाकडून पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून फुले किंवा फुलदाणी वाहिली जाते(दत्ता खेडेकर)

गेलेल्या वर्षात काय केले, याचा आढावा घेत, नवीन वर्षासाठी शुभसंकल्प करावा अशी अपेक्षा असते (दत्ता खेडेकर)

आजच्या दिवशी शेवया, शिरा, मिष्ठान्न व विशेषत: गोड दही आदी पदार्थ बनविले जातात (दत्ता खेडेकर)

सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करून नवे कपडे परिधान केले जातात (दत्ता खेडेकर)