हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 74 टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत on Fri, November 10, 2017 12:02am

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 74 टक्के मतदान झाले.
या निवडणुकीत 50 लाख मतदारांनी मतदान केले असून, 68 जागांवर उभे असलेल्या 337 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत कैद झाले आहे
सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 74 टक्के मतदान झाले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन खराब झाल्याच्याही तक्रारी आल्या आहेत.
काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
निवडणूक सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी 80 टक्के केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांना हिमाचल प्रदेशमध्ये तैनात करण्यात आले होते.

राष्ट्रीय कडून आणखी

राजकीय इनिंग सुरू करणाऱ्या कमल हासन यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी
थायलंडमधील ही कमांडो ट्रेनिंग पाहून व्हाल थक्क
नरेंद्र मोदी यांनी दाखविला 'हमसफर एक्स्प्रेस 'ला हिरवा झेंडा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांची साबरमती आश्रमाला भेट
पीएनबीचा इतिहास 122 वर्षं जुना, महात्मा गांधींचंही होतं खातं

आणखी वाचा