या आहेत आदिवासींच्या वेगवेगळ्या जमातीतील अजब-गजब 7 प्रथा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 10:23 PM2018-11-28T22:23:13+5:302018-11-28T22:27:07+5:30

सेंटिनल आदिवासी - देशात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करत असला तरी भारतात अशा काही जाती-जमाती आहेत ज्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. त्यांच्या प्रथा-परंपराही वेगवेगळ्या आहेत. अमेरिकन व्यक्तीची हत्या करून अंदमानातील सेंटिनल ही आदिवासी जमात चर्चेत आली होती. या जमातीला लाल रंग फार आवडते. ते मासे, डुक्कर आणि इतर जनावरांचं भक्षण करतात. परंतु हरणाला ते पवित्र मानतात, त्यामुळे त्याचं मांस ते खात नाहीत.

जारवा जनजाती - यांच्या प्रथाही सेंटिनल आदिवासीसारख्याच आहेत. तसेच तिथे अल्पवयीन मुलगा सज्ञान झाल्यानंतर त्याचं नाव बदलण्याची प्रथा आहे. मुलींना माती, डुक्कराचं तेलाचा टिका लावला जातो.

चेंचस आदिवासी जमात- चेंचस अनुसूचित जातीही मुख्यतः आंध्र प्रदेशात आढळते. त्यांची विचार करण्याची क्षमता प्रगत आहे. तिथे तरुणांना कोणाशीही लग्न करण्याची मुभा असते. आई-वडील मुलांवर दबाव टाकू शकत नाहीत. तसेच एका गोत्रात लग्न होत नाही.

भिल जमात- राजस्थानातील भिल ही आदिवासी जमातही प्रसिद्ध आहे. भिलांच्या स्वतःचे नियम आणि परंपरा असतात. भिल समुदायामध्ये महिलांना स्वातंत्र्य असते. या महिला पुरुषांबरोबरच मद्याचं सेवन करू शकतात.

संथाल आदिवासी जमात- संथाल ही आदिवासी जमात पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड आणि आसाममध्ये आढळते. त्यांचा शहरी भागाशी कोणताही संपर्क नसतो. ते संथाली या भाषेव्यतिरिक्त इतरही भाषा बोलतात. संथाल नास्तिक नसतात, परंतु ते मूर्तिपूजा करत नाहीत.

मुंडा आदिवासी जमात- झारखंडमधली ही मागास जनजाती आहे. खेळ, राजकारण आणि साहित्यात मुंडा जनजातीच्या लोकांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे. याच जनजातीचे राम दयाल मुंडा यांना पद्मश्रीनंही सन्मानित करण्यात आलं होतं.

खासी आदिवासी जमात- मेघालयातील ही खासी जनजाती फारच नावाजलेली आहे. खासी जमात ही फारच शांत असते. ते खासी भाषा बोलतात. जास्त करून खासी जनजमातीचे लोक धर्माचं पालन करतात. तर काहींनी इस्लाम आणि ईसाई धर्म स्वीकारला आहे. या जमातीत मातृसत्ताक परंपरा आहे. या समाजातील लोकांमध्ये आईला सर्वोच्च स्थान देण्यात आलं आहे. या जमातीच्या प्रथा या काहीशा हिंदू परंपरांसारख्या आहेत.