'अब तुम्हारे हवाले वतन साथियों'... वीरपुत्र निनाद मांडवगणे अमर रहे...!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 05:20 PM2019-03-01T17:20:25+5:302019-03-01T17:42:41+5:30

जम्मू-काश्मिरच्या भारत-पाक सीमेवर मागील चार दिवसांपासून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थीतीत लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे सीमेवर टेहळणी करत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) यांना वीरमरण आले.

वायू सेनेच्या वतीने सजवलेल्या वाहनातून त्यांचे पार्थिव डिजीपी नगर येथील शहीद निनाद यांच्या निवासस्थानी नेण्यात आले तेथे त्यांच्या कुटुंबीय आणि नाशिकमधील हजारो नागरिकांनी अंत्य दर्शन घेतलं.

नाशिक भारतीय वायुसेनेच्या तुकडीने, पोलिसांच्या तुकडीने शहीद निनाद यांचे पार्थिव त्यांच्या निवास्थानी पोहोचवले

आपल्या गावच्या भूमिपुत्राला पाहण्यासाठी नागरिकांस प्रशासन अन् पत्रकारांनीही यावेळी गर्दी केली होती.

नाशिक शहीद निनाद यांच्या माता-पित्याचे सांत्वन करताना निवासस्थानी भारतीय वायुसेनेचे अधिकारी

शहीद निनाद यांचे पार्थिव दर्शनासाठी अमरधाम मैदानात ठेवण्यात आले होते. त्यावेळी आपल्या मुलाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना जन्मदाता आई अन् पिता, काळजावर दगड ठेवावा असा हा कठीण प्रसंग

निशब्द होऊन जावं, काय कॅप्शन द्यावं. देशासाठी शहीद झालेल्या आपल्या बापाला काय बर सांगत असेल हे चिमुकलं बाळ

शहीद निनाद मांडवगणे यांच्या अंत्यसंस्कारासाठी नाशिकच्या अमरधाममध्ये हजारोंचा समुदाय, तिरंगा ध्वज हातात घेऊन वंदे मातरम आणि भारत माता की जयचा जयघोष करत होता.

शहीद निनाद यांच्या अंत्यसंस्कारासाठी नाशिक अमरधाम येथे मोठी गर्दी झाली असून मानवंदना देण्यासाठी वायू सेनेचे पथकही दाखल झाले होते.

वायू सेनेतील अधिकाऱ्यांनी देशाची शान असलेला तिरंगा शहीद निनाद यांच्या वीरपत्नीकडे सुपूर्द केला, या वीरपत्नीच्या धैर्याला सॅल्यूट

कुठून येतं हे धैर्य, कुठून येतो हा जज्बा, पतीच्या निधनानंतरही समोरच्या परिस्थितीला सामोरे जाताना सॅल्यूट करण्यासाठी उचललेला हा हात म्हणजे.... जय हिंद

शहीद जवान अमर रहे, भारत जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी दुमदुमला परिसर. तसेच तोफखान्याच्या जवानांनी शहीद निनाद मंडवगणे यांना सशस्त्र मानवंदना दिली

पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गीते हेही अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते

शाहिद निनाद यांना निरोप देण्यासाठी गोदाकाठी जनसागर उसळला आहे. भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तिरंगा ध्वज घेऊन नागरिक आले असून शाळकरी मुलांचाही समावेश आहे.