रात्रीच्या काळोखातील नाशिकचं निसर्गसौंदर्य पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 06:06 PM2018-06-11T18:06:24+5:302018-06-11T18:06:24+5:30

नाशिकमध्ये धार्मिक स्थळं मोठ्या प्रमाणात आहेत. येथे कायमच भाविकांची रिघ असते.(सर्व छायाचित्रं- प्रशांत खरोटे)

रात्री गोदाकाठला भेट दिल्यास तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येते.

तसेच दिवसा असलेली गर्दी नाशिकमध्ये रात्रीही पाहायला मिळते. पंडित जवाहरलाल नेहरू वनउद्यानतही पर्यटकांची गर्दी असते.

मंद वा-याची झुळूक आणि दिव्यांच्या प्रकाशात झळाळून निघालेली गोदामाई आणि काठावरील मंदिरे आकर्षून घेतात.

नाशिकचं निसर्गवैभव समजल्या जाणा-या पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान अर्थात बॉटनिकल गार्डन प्रवेशद्वार आकर्षक फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे.

रात्रीच्या काळोखात नेकलेस म्हणून ओळखला जाणारा उड्डाणपूल बघण्याची मज्जा काही औरच आहेत. पथदिव्यांच्या प्रकाशात वाहनांची सुरू असलेली वा-याशी स्पर्धा खरंच पाहण्यासारखी आहे.

टॅग्स :नाशिकNashik