राज ठाकरेंच्या सभांचा झंझावात सुरु; सभेपूर्वी दिली गुरुद्वाराला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 04:18 PM2019-04-12T16:18:59+5:302019-04-12T16:34:49+5:30

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा झंझावात आजपासून सुरु होणार आहे.

नांदेडमधील नवी मोढा येथे त्यांची पहिली जाहीर सभा होणार आहे. या सभेआधी गुरुद्वाराचे दर्शन घेतले.

लोकसभा निवडणूक दौऱ्यातील राज ठाकरेंची ही पहिलीच सभा असून आणखी 19 तारखेपर्यंत आणखी 5 म्हणजेच एकूण सहा सभांचे नियोजन करण्यात आले आहे.

नांदेड येथील सभा झाल्यानंतर १५ एप्रिल रोजी राज ठाकरे यांची सोलापूर येथे सभा होणार आहे.

यानंतर १६ एप्रिल रोजी कोल्हापूर, १७ एप्रिल रोजी सातारा, १८ एप्रिल रोजी पुणे तर १९ एप्रिल रोजी महाड येथे ते जाहीर सभा घेणार आहेत.

मनसेने लोकसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार रिंगणात उतरविलेले नाहीत.

मात्र, देश आणीबाणीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे सांगत याबाबत जनजागृती करण्यासाठी राज ठाकरे सभा घेणार आहेत.

तसेच, पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नको हे सांगण्यासाठीच लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत या सभा घेत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील औरंगाबाद वगळता इतर सर्व जागांसाठी मतदान होणार आहे.

नांदेडचाही यामध्ये समावेश आहे. त्यापूर्वी राज ठाकरे सभा घेऊन राजकीय वातावरण ढवळून काढणार आहेत. (सर्व फोटो - सचिन मोहिते)