राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा नागपूर दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 02:55 PM2017-09-22T14:55:36+5:302017-09-22T15:22:39+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शुक्रवारी ( 22 सप्टेंबर ) भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विमानतळावर स्वागताचा स्वीकार करून दीक्षाभूमीला दिली भेट

दीक्षाभूमीला भेट देऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतलं दर्शन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला राष्ट्रपतींनी पुष्पांजली अर्पण केली

राष्ट्रपतींसोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेदेखील उपस्थित होते

स्तुपाच्या आत जाऊन गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

'पवित्र दीक्षाभूमी संपूर्ण विश्वाला त्याग, शांती व मानवता याकडे जाण्यास प्रेरणा देते. मला येथे येऊन अपार प्रसन्नता होत आहे', असे यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिप्राय पुस्तिकेत

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीत पाच मिनिटं केले ध्यान

डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने राष्ट्रपतींना स्मृतीचिन्ह व ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा बौद्ध धम्मग्रंथ देण्यात आला

राष्ट्रपतींनी यावेळी दीक्षाभूमीच्या परिसराचे अवलोकनही केले

राष्ट्रपतींनी ड्रॅगन पॅलेस विपश्यना केंद्राचे केलं लोकार्पण