'लोकमत सूर ज्योत्स्ना पुरस्कारा'चा रंगतदार सोहळा, दिग्गजांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 10:55 PM2019-03-23T22:55:42+5:302019-03-23T23:13:28+5:30

लोकमत सूर ज्योत्स्ना पुरस्कार सोहळ्यात कहते है ये दीवानी... म्हणत श्रेया घोषाल मंचावर आली आणि माहौल मस्तानी झाले... नागपूर में आ के बहोत ही अच्छा लग रहा है... असे म्हणत श्रेयाने नागपुरकरांना साद घातली

सूर ज्योत्स्ना पुरस्कार 2019 या कार्यक्रमात गायिका श्रेया घोषाल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी लोकमत वृत्तपत्र एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा हेही उपस्थित होते.

सूर ज्योत्स्ना पुरस्कार-२०१९ च्या निमित्ताने नागपूरकरांना श्रेयाच्या गाण्याची मेजवानी मिळाली, या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकमत समुहाच्या एडिटोरिय बोर्डचे चेअरमन विजय दर्डा आणि लोकमत समुहाचे व्यवस्थापकीय आणि संपादकीय संचालक ऋृषी दर्डा हेही उपस्थित होते

लोकमत ज्योत्न्ना पुरस्कार 2019 - देशात सुरू असलेल्या निवडणुकीसंदर्भात तर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना विचारत नसतील ना....

लोकमत ज्योत्न्ना पुरस्कार 2019 - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकमत वृत्तसमुहाचे एडिटोरिय चेअरमन विजय दर्जा यांच्यासह गायक स्पर्धक आणि मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून रंगतदार बनवले

या कार्यक्रमातील पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरींसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

लोकमत ज्योत्न्ना पुरस्कार 2019 या कार्यक्रमात लोकमत वृत्तसमुहाचे एडिटोरिय चेअरमन विजय दर्जा यांच्या संवादानंतर काही चेहऱ्यावर हास्यही उमलले