उपराजधानीत पोळ्यानिमित्त सजली बाजारपेठ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 10:32 AM2018-09-06T10:32:28+5:302018-09-06T10:38:21+5:30

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. रविवारी आलेल्या पोळ्याच्या निमित्ताने उपराजधानीतील बाजारपेठ साजशृंगारांनी सजली आहे.

वैविध्यपूर्ण रंगातील झुली विशेष आकर्षण ठरल्या आहेत.

खरं तर या दिवशी बैलांचा थाटच असतो. आपला बैल गावामध्ये उठून दिसावा म्हणून शेतकरी साजशृंगारावर भर देतात.

मटाट्या, बाशिंग, घुंगरमाळा, नवी वेसण, नवा कासरा, शिंगांना बेगड, सुरेख नक्षिकाम केलेली मखमली झूल, पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे अशा नानाविध साजशृंगारांनी बैलांना सजविले जाते.