जाणून घ्या, पाच वर्षांत नितीन गडकरींची किती वाढली संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 08:08 PM2019-03-26T20:08:49+5:302019-03-26T20:13:48+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपुरातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात स्वतःच्या संपत्तीची माहिती दिली आहे.

नितीन गडकरींच्या यांची संपत्ती पाच वर्षांत मोठी वाढ झाली आहे.

नितीन गडकरींनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, 2017-18मध्ये नितीन गडकरींचं वार्षिक उत्पन्न 6.4 लाख रुपये होते.

तत्पूर्वी 2013-14मध्ये दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात गडकरींचं वार्षिक उत्पन्न 2.7 लाख रुपये घोषित केलं होतं. जे आता वाढून 6 लाखांपर्यंत गेलं आहे.

तसेच नितीन गडकरींच्या पत्नीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. त्यांच्या उत्पन्नामध्ये 10 टक्के वाढ नोंदवली आहे. 2013-14मध्ये नितीन गडकरींच्या पत्नीचं वार्षिक उत्पन्न 4.6 लाख रुपये होते. जे 2017-18ला वाढून 40 लाख रुपयांवर गेले आहे.

नितीन गडकरीची एकूण संपत्ती 6.9 कोटी रुपये आहे. यात फक्त 1.96 कोटी रुपये वडिलांची संपत्ती आहे. 2014च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत 10 टक्के वाढ झाली आहे.

नितीन गडकरींच्या पत्नीकडे आता जवळपास 7.3 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2014च्या तुलनेत गडकरींच्या पत्नीच्या संपत्ती 127 टक्के वाढ झाली आहे. गडकरींचा वरळीमध्ये एक आलिशान प्लॅटसुद्धा आहे.