मुंबापुरीची तुंबापुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 10:52 PM2018-06-09T22:52:11+5:302018-06-09T22:52:11+5:30

शनिवारी दिवसभर मुंबईत पावसानं जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं. (सर्व फोटो: सुशील कदम)

पाऊस सुरू झाल्यानंतरच्या पहिल्याच आठवड्यात असे हाल झाल्यानं चार महिने काय त्रास सोसावा लागणार, असा प्रश्न आज बहुतांश मुंबईकरांना पडला.

पाणी साचल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. मात्र बच्चे कंपनीनं हा पाऊस चांगलाच एन्जॉय केला.

मुंबापुरीची तुंबापुरी होणं कधी थांबणार, असा सवाल या पावसामुळे उपस्थित झाला.

अनेक भागांमध्ये पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे लोकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागली.