जलमय मुंबई, जिकडे तिकडे पाणीच पाणी....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 01:17 PM2018-07-09T13:17:12+5:302018-07-09T13:42:27+5:30

मुंबईत गेली दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे. ठाण्यासह मुंबईतील अनेक सकल भागात पाणीबाणी सदृश्य परिस्थीती निर्माण झाल्याचे दिसत आहे. गुडघाभर पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे.

मुंबईतील पावसाचा फटका लोकल प्रवाशांनाही बसतो. लोकलच्या वाहतुकीवर मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम होतो. या लोकल कधी रद्द होतात, तर कधी उशिराने सुरू होतात.

सेंट्रल लाईन, हार्बर लाईनवरही पाणीच-पाणी झाले आहे. ठाण्यातील लोकल स्टेशनवरील ट्रॅक पाण्यासाठी गेले आहेत. या पाण्यातूनच रेल्वेचा लोकल प्रवास सुरू आहे.

मुंबईत रस्ते, वसाहती आणि गल्लीबोळातून पाणी वाहताना दिसत आहे. या वाहत्या पाण्यातूनच उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईकरांना बाहेर पडावे लागत आहे. पाण्यातून मार्ग काढताना मुंबईतील एक रिक्षाचालक या छायाचित्रात दिसत आहे.

मुंबईत कितीही पाऊस असला तरी काम कुणाला चुकलयं का, कामावर जाण्यासाठी कुणी छत्री घेऊन घरातून बाहेर पडलयं, तर कुणी रेनकोड परिधान करुन पावसातून मार्ग काढत आहे.

पावसाच्या पाण्याने रस्त्यावरच नाही तर दुकानातही शिरकाव केला आहे. त्यामुळे अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवून पावसापासून सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. या छायाचित्रातआपल्या दुकानात शिरलेले पाणी काढताना एक दुकानदार दिसत आहे.

रस्ते, दुकानं आणि आता वसाहतींच्या आतमध्येही पाण्याने प्रवेश केला आहे. कॉलनीतील पार्किंग झोनमध्ये जणू तळे साचले आहे.

मुंबईतील लोकलचे ट्रॅक पाण्यासाठी गेल्याने, पाण्यावर तरंगणारी लोकल सुरु झाली की काय ? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.

मुंबईतील मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. रस्त्यावरील पाण्यातून शाळेसाठी मार्ग काढताना 2 विद्यार्थी दिसत आहे.

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ? हे गाणं मुंबईतील ठिकठिकाणच्या पावसामुळे साचलेले पाणी पाहून आठवल्याशिवाय राहणार नाही.