मुंबईसह राज्यात कोसळताहेत जल'धारा'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2017 05:55 PM2017-09-20T17:55:38+5:302017-09-20T17:59:23+5:30

मुंबईत मंगळवारपासून (19 सप्टेंबर ) पावसाची संततधार कायम, जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पावसाचं साचलं पाणी.

पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात वाहतूक मंदावली

पावसामुळे मुंबई विमानतळावरील उड्डाणंही रद्द करण्यात आली, यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला

ठाणे शहरात टाटा बसवर कोसळलं झाड. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही

ठाण्यातील स्वामी विवेकानंद नगर परिसरात दोन घरांसह एक टेम्पोवर झाड कोसळले

पनवेलमधील करंजाडे नदीच्या पाणीपातळी वाढ

माळशेज घाटातून जाणारा कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग क्र.222 पावसामुळे सुमारे दोन ते तीन तास वाहतुकीसाठी बंद करावा लागला.