चेंबूरमध्ये झाड कोसळून आणखी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत on Thu, December 07, 2017 11:55pm

चेंबूरमध्ये झाडं अंगावर कोसळून एका महिला प्रवासीचा आज सकाळी दुर्दैवी अंत झाला. चेंबूरमधील ही दुसरी घटना आहे.
चेंबूरमध्ये डायमंड गार्डन परिसरातील बस थांब्यावर आज सकाळी ११ च्या सुमारास शारदा सहदेव घोडेस्वार (वय ४५) बसची वाट पाहत होत्या. बराच वेळ बस नसल्याने त्या जवळच असलेल्या झाडाशेजारील बाकावर बसल्या.
त्याचवेळी अचानक झाड अंगावर पडून त्या जबर जखमी झाल्या. स्थानिकांनी त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पांजरपोळ येथे राहणा-या शारदा चेंबूर येथे घरकाम करीत होत्या. तिथल्याच ड्रिमलँड सोसायटीमध्ये घरकाम आटपून त्या बाहेर पडल्या होत्या. मात्र सोसायटीबाहेरील बस थांब्याजवळील गुलमोहरच्या झाडाने त्यांचा बळी घेतला.
याआधी जुलै महिन्यात चेंबूरमधील स्वस्तिक पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या कांचन नाथ या महिलेवर माडाचे झाडं कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे धोकादायक स्थितीत उभी झाडं मुंबईकरांसाठी मृत्युचा सापळा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

संबंधित

जलमय मुंबई, जिकडे तिकडे पाणीच पाणी....
ट्रेकिंगला जायचंय? मुंबईजवळच्या 'या' पाच किल्ल्यांचा नक्की विचार करा
अंधेरी स्टेशनवर पादचारी पुलाचा भाग कोसळला
मुंबईची वाढली शान; 'या' वास्तूंना मिळाला जागतिक वारशाचा मान
#BiggBossMarathi चे घर झाले एका बसमध्ये बंदिस्त, प्रेक्षकांना पाहण्यासाठी घर केले खुले

मुंबई कडून आणखी

मुंबईची वाढली शान; 'या' वास्तूंना मिळाला जागतिक वारशाचा मान
Chartered Plane Crashed In Mumbai : घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून 5 जणांचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत 'पाणीबाणी'... धो-धो पावसाने रस्ते गेले पाण्याखाली
#Monsoon2018 गाडीच्या छत्रीपासून ते बॅगच्या कव्हरपर्यंत, पावसाळ्यात विविध वस्तूंनी सजल्या बाजारपेठा
International Yoga Day 2018 : जागतिक योग दिनाचा नागरिकांमध्ये उत्साह

आणखी वाचा