विद्यार्थ्यांनी रंगवलेली स्वच्छ भारत लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 09:19 PM2018-09-24T21:19:21+5:302018-09-24T21:24:35+5:30

मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छता पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. मध्य रेल्वे शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत बाबत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी थेट लोकल रंगवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

रंगवलेली लोकल २ ऑक्टोबर रोजी हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे.

कल्याण येथील मध्य रेल्वेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पंधरवड्यात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला.

शाळेतील मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत संकल्पनेवर आधारित २० विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मदतीने ही लोकल रंगवण्यात आली आहे.

तिरंग्यात रंगवलेल्या लोकलवर महात्मा गांधी यांचे चित्रे देखील रेखाटण्यात आले आहे.

कळवा कारशेडमधील कर्मचा-यांनी बेसिक रंग दिल्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत संदेश, महात्मा गांधी यांचे चित्रे रेखाटत मध्य रेल्वेच्या स्वच्छता पंधरवड्यात सहभाग घेतला.

ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल मार्गावर ही लोकल चालवण्याची शक्यता असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.